Quick Spark (Shorts)
सारा पसारा | Swayam Podcast
1.6K views
June 12, 2023
8:29
About this talk
धनश्री लेले त्यांच्या ‘सारा पसारा’ या लेखात मनाच्या चंचलतेचं वर्णन करतात.
सजीव माणसांइतकाच निर्जीव वस्तूसुद्धा तुम्हाला लळा लावू शकतात हे पहायचं असेल तर स्वयंपाकघरातल्या कपाटात डोकावून पाहा. वर्षानुवर्षे साठवून ठेवलेल्या गोष्टी नको नको म्हणत जमवलेल्या असतात. ते करण्यामागचे भावनिक बंध अनमोल असतात. मानवी मनाचे पापुद्रे हळुवार उलगडून दाखविणारा तो पसारा मग मात्र हवाहवासा वाटू लागतो. धनश्री लेले त्यांच्या ‘सारा पसारा’ या लेखात त्या सर्वांच्याच मनातलं हे गुपित उघड करतात आणि आपणही त्यात नकळत गुरफटून जातो.
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अमोघ रसाळ वाणीने मंत्रमुग्ध करणाऱ्या धनश्री लेले या एक प्रज्ञाव...